पाच पैकी चार राज्यांमध्ये सध्या भाजप आघाडीवर आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ठीकठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून ढोल ताशा वाजवत मुलुंडच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर विजयोत्सव साजरा केला जात आहे. ही विजय लाट कायम राहत मुंबईत देखील भाजपचाच महापौर बसेल अशी प्रतिक्रिया खासदार मनोज कोटक यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना दिली.